Clubhouse logo

Komal Mali

@komal_mruda

243

friends

.आता तू एक स्वप्नासारखा आहेस माझ्यासाठी... कधीकाळी रोज पडणार स्वप्न, सत्यात उतरता उतरता राहिलेलं, डोळे मिटले की दिसणारं आणि.... जाग आली अन् तुझ्या आता कुठेच नसण्याची जाणीव झाली की, डोळ्यात तळ साठणारं. किती केलं तरी अजून या डोळ्यांना कळत नाही की, न येणाऱ्यांची वाट पाहायची नसते. आठवणीत रमणाऱ्या मनाला, कितीही कामाला जुंपल तरी, ते बापड मिळेल त्या फटीतून पळत राहतं त्या आठवणींमागे सैरावैरा. मी त्याला आणि तुला, दोघांना समजावणं सोडून दिलं आहे. मला माहिती आहे, ऐकणं तुम्हा दोघांच्या स्वभावात नाहीये. - कोमल_मृदा